दारूविक्रीच्या स्पर्धेतून युवकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:19+5:30
राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनमुळे विदेशी दारू मिळणे अवघड झाल्याने दारूविक्रेते गावठी दारूविक्रीकडे वळले आहेत. अशातच काही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून दारूविक्रेत्यांच्या या स्पर्धेतूनच तिघांनी मिळून एका युवकाचा ‘गेम’ केला. गुरुवारी दुपारी १ वाजता शहरालगतच्या कारला या गावात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. राहुल हा साटोडा गावात दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. गावात वाढती दारूविक्री पाहता महिला मंडळाने गावातून दारूविक्री बंद केली.
लगतच्या कारला गावात श्रावण राऊत व छन्नू नामक व्यक्ती दारुविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने राहुलने श्रावणशी हात मिळवणी करून आपला नव्याने व्यवसाय सुरू केला. त्यामुळे छन्नूच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गुरुवारी सकाळी राहुल व छन्नू या दोघांत वाद झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय गावकºयांकडून व्यक्त केला जात आहे.
गावकºयांच्या तक्रारीकडे पोलिसांची पाठ
मागील काही दिवसांपासून कारला गावात दारूचा महापूर ओसंडून वाहत होता. श्रावण, छन्नू आणि राहूल हे तिघेही राजरोसपणे गावठी दारूची विक्री करीत होते. याबाबत कारला येथील बचत गटाच्या महिलांसह नागरिकांनी सावंगी पोलिसांना माहिती दिली. पण, त्यांनी दखल घेतली नाही. अखेर आमदारासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दारूविक्रेत्यावर कारवाई केली. सावंगी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच राहुलची हत्या झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
एका तासात आरोपी ताब्यात
कारला गावात झालेल्या हत्येच्या घटनेतील तिन्ही आरोपींना अवघ्या एका तासात शोधून काढले. सर्व आरोपी सावंगी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पैशाच्या देवणा-घेवाणीतून आणि जुन्या वादातून राहुल मगरची हत्या झाल्याचा अंदाज सावंगी पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तपासाअंतीच हत्येचे कारण कळू शकेल, असे सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.