बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:57 PM2018-11-05T21:57:13+5:302018-11-05T21:57:35+5:30

राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले. येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Buddhist Vihar can be a ritual center | बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावे

बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावे

googlenewsNext
ठळक मुद्देवैशाली डोळस : जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले.
येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आनंद महाथेरो (दिल्ली) होते. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांच्या हस्ते झाले. मुख्य मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, साहित्यिक अँड. वैशाली डोळस, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. सुभाष खंडारे, राजाभाऊ ताकसाडे, सुनील ढाले, निगोट, बी.एस.पाटील, प्राचार्य आर. के. पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक भदंत राजरत्न व स्वागताध्यक्ष गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्रियाला स्वातंत्र्याचा हक्क देणारा बौद्ध धर्म हा जगातला पहिला धर्म आहे, समानता हा धम्माचा पाया असून प्रत्येकाचा सन्मान हे धम्माचे मूल्य आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची सुरुवात भदंत सत्यानंद महाथेरो येनाळा, अरण्यवास यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना करुन झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बुध्द वंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उदघाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून गोरख भगत यांनी डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित असणाऱ्या समाजाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. उद्घाटक अनिल जवादे यांनी बौध्द धम्म हा लोकांना जोडणारा आहे, असे सांगितले.
राजरत्न आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा बहिष्कृत संघटनेच्या स्थापणेपासून बुद्धीष्ट सोसायटीपर्यंतच्या इतिहासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत महाथेरो यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात याची माहिती दिली. यानंतर संविधान भारती संच नागपूर यांचा बुध्द भीम गितांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर.के. पाटील, उपप्राचार्य एच. पी.गुडधे, उपमुख्याध्यापक एस.एम.राऊत, पर्यवेक्षक दिनेश वाघ, डब्ल्यू. एन.पडवे, एस. ए.बनसोड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. धम्म परिषदेला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुवर्ण महोत्सवी समारोपीय कार्यक्रम
हिंगणघाट - स्थानिक डॉ. बी. आर.आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार ४ नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धम्म परिषद, स्नेह संमेलन घेण्यामागील भूमिका प्राचार्य आर.के पाटील यांनी विशद केली. प्रसिद्ध साहित्यिक ना .गो .थुटे यांनी विद्यार्थ्यांना माता,पिता व गुरू यांचा सन्मान करावा, ज्ञानाची तृष्णा, गुरुवर निष्ठा व अध्ययनात सातत्य असेल तरच विद्यार्थी घडतो असे सांगितले. व्यासपीठावर अशोक जवादे, प्रशांत जवादे, रमण जवादे, मंदाकिनी जवादे, अनुराधा जवादे, खोब्रागडे, गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विचाराने, कृतीने व स्वत:च्या प्रयत्नाने चांगलें नागरिक बनावे तसेच वैचारिक दृष्टीने समृद्ध नागरिक बनविणे हेच संस्थेचे ध्येय आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्याने विदर्भ राज्य निर्मिती- घटनात्मक तरतुदी या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संचालन व आभार प्रा.उमेश ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेतील सर्वं विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Buddhist Vihar can be a ritual center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.