तुळजापूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:16 PM2019-07-19T22:16:30+5:302019-07-19T22:17:55+5:30

दहेगाव गोसावी नजीकच्या तुळजापूर येथे फुट ओव्हर ब्रिज नसल्याने २१ गावांमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, खासदारांसह सत्ताधारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी उड्डाण पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत.........

Build a bridge over the Tuljapur railway station | तुळजापूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल बांधा

तुळजापूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल बांधा

Next
ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीची मागणी : ढोल-नगारा वाजवून वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दहेगाव गोसावी नजीकच्या तुळजापूर येथे फुट ओव्हर ब्रिज नसल्याने २१ गावांमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, खासदारांसह सत्ताधारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी उड्डाण पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-नगारा वाजवून सदर उड्डाणपुलाची मागणी तात्काळ निकाली काढण्याचा विषय रेटण्यात आला. सदर आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
दहेगाव गोसावी (तुळजापूर रेल्वे स्थानक) येथे फुटओव्हर ब्रिज बांधण्यात यावा. इंटरसिटी व जबलपूर एक्स्प्रेसचा दिलेला थांबा कायम करण्यात यावा. तुळजापूर रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची वाढविण्यात यावी. जड वाहनांची ये-जा होण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्यात यावा. मंजूर करण्यात आलेल्या वाहतूक मार्गाचे सिमेंटीकरण व रुंदीकरण करण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने मगनसंग्रहालय भागातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. या मोर्चात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच तुळजापूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आला असता तेथे अनिल जवादे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी ढोल व नगाडा वाजवून सरकारच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ आल्यावर पोलिसांनी तो अडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ राज्य पार्टीचे नेते अनिल जवादे यांनी केले.

Web Title: Build a bridge over the Tuljapur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.