पालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:54 PM2018-03-20T23:54:27+5:302018-03-20T23:54:27+5:30

नगर पालिकेत विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत दबाव तंत्राने कामे करून घेतली जातात. यामुळे कर्मचाऱ्यांत भीती आहे. या भितीयुक्त वातावरणात काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे.

Build a frightful atmosphere in the corporation | पालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करा

पालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करा

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारी व मजदूर संघाचे एसडीओंना निवेदन : आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : नगर पालिकेत विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत दबाव तंत्राने कामे करून घेतली जातात. यामुळे कर्मचाऱ्यांत भीती आहे. या भितीयुक्त वातावरणात काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. यामुळे तीन दिवसांत पालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी म.रा. न.प. कर्मचारी व अ.भा. सफाई मजदूर संघटनेने केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे यांना निवेदन देत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
पूर्वसूचना न देता निलंबित केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे. २५ वर्षांपासून विविध विभागात लिपिक, शिपाई पदाचा अतिरिक्त मोबदला न घेता काम करणाºया चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना दुय्यम वागणूक देत आता मूळ पदावर पाठविले जात आहे. त्यांना सद्यस्थितीतील पदावर कायम ठेवावे. १५-२० वर्षांपासून पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था सांभाळणाºया बदली केलेल्या कर्मचाºयांना पूर्ववत त्याच पदावर घ्यावे. स्वास्थ निरीक्षक असताना त्यांचे काम अतांत्रिक कर्मचाऱ्यांना देऊन अपमानित करणे थांबवावे. न.प. रोजंदारी कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार समायोजन होईपर्यंत त्यांना योग्यतेनुसार कामे द्यावी. सर्व विभाग प्रमुखांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊन बडतर्फीची वागणूक देणे व आढावा सभेचे निमित्त करून अतिरिक्त वेळी त्रास देणे बंद करावे. सुटीच्या दिवशी स्वच्छता सर्वेक्षणाचे काम करणाºयांना कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्यांसह सफाई कामगारांशी जातीवाद केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती न.प. मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, केंद्रीय व राज्य सफाई कामगार आयोग यांना देण्यात आले आहे.

Web Title: Build a frightful atmosphere in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.