वर्धा जिल्ह्यात तिसऱ्या वर्षीही 'त्या' इमारतीला ताडपत्रीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:16 PM2020-06-06T13:16:01+5:302020-06-06T13:16:21+5:30

वर्धा जिल्ह्यात घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.

'that' building on tarpaulin for the third year in Wardha district | वर्धा जिल्ह्यात तिसऱ्या वर्षीही 'त्या' इमारतीला ताडपत्रीचाच आधार

वर्धा जिल्ह्यात तिसऱ्या वर्षीही 'त्या' इमारतीला ताडपत्रीचाच आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.
तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींची कार्यालये चकाचक असताना, गावातील कार्यालये मात्र दरवर्षी ताडपत्रीनी झाकली जात असल्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो आहे. घोराड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाची कौले माकडांमुळे पूर्णपणे फुटली आहेत. त्यावर झाकलेली ताडपत्री दरवर्षी फाटते व उडते. जास्त पाऊस आला तर इमारत गळू लागते. येथील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालूनच येथे कामकाज पाहत असतात. या इमारतीला लागून पशू संवर्धन कार्यालयाची इमारत आहेत. तीही इमारत अशाच प्रकारने जीर्ण अवस्थेत आहे. सभापती निवासात तीन विभागांचे कार्यालय आहे. नरेगा, पशू संवर्धन व हँन्डपंप दुरुस्ती विभागाचे कर्मचारी येथूनच काम करत असतात. या जीर्ण इमारतींमध्ये संगणक, फाईल्स आदी दस्तावेज आहे. या सर्वांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: 'that' building on tarpaulin for the third year in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार