बुलडाण्यात गवसला ‘तो’ दुचाकी चोरटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:29 PM2018-11-19T22:29:09+5:302018-11-19T22:29:28+5:30
खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुचाकी चोरट्याला बुलढाणा येथून अटक करण्यात यश आले आहे. सदर चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे वाहन जप्त केले आहे. नरेश नत्थूजी कोडापे (२९) रा. मालखेड जि. अमरावती, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुचाकी चोरट्याला बुलढाणा येथून अटक करण्यात यश आले आहे. सदर चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे वाहन जप्त केले आहे. नरेश नत्थूजी कोडापे (२९) रा. मालखेड जि. अमरावती, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खरांगणा (मो.) ग्रा.पं.च्या आवारात ठेवून असलेली एम.एच.३१ बी.एफ. ७५०८ क्रमांकाची दुचाकी २१ एप्रिल २०१८ ला चोरी गेल्याची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी सुनील चौधरी रा. पिपरी (मेघे) यांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात सिंदखेडराजा पोलिसांना गवसला असता तपासादरम्यान त्याने खरांगणा ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे कबुली पोलिसांना दिली. सिंदखेडराजा पोलिसांनी खरांगणा पोलीस स्टेशनला या चोरीची माहिती दिली असता जामदार प्रकाश कोवे, मनिष मसराम, रामेश्वर आडे यांनी आरोपीला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. आरोपी हा त्या काळात वर्धेतील एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याची दोन दिवसीस पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगांवकर, हुसेन कादर, शहा, जामदार प्रकाश कोवे यांनी केली.