बंदुकीच्या धाकावर रोखेसह साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:32 PM2018-10-29T22:32:25+5:302018-10-29T22:32:42+5:30

दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवत रोखसह सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला. ही घटना जुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The bullet holds the material with a bunker | बंदुकीच्या धाकावर रोखेसह साहित्य पळविले

बंदुकीच्या धाकावर रोखेसह साहित्य पळविले

Next
ठळक मुद्देजुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवत रोखसह सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला. ही घटना जुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गजानन नगर येथील सुधीर अजाबराव कोवार हे त्याच्या काही निकटवर्तीयांसह स्मशानभूमी चौक मार्गे सेवाग्राम रेल्वे स्थानक येथून वर्धा शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान मागाहून आलेल्या काही तरुणांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्याची वाद घालत त्यांना मारहाण केली. याच वेळी आरोपींनी बंदूकीचा धाक दाखवत सुधीर जवळील दोन मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख ४०० रुपये हिसकावून घटना स्थळावरून पळ काढल्याचे तक्ररीत नमुद असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी सुधीर कोवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, श्रीकांत खडसे करीत आहे.

Web Title: The bullet holds the material with a bunker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.