कालवे,पाटचºयांना झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:11 PM2017-11-11T22:11:30+5:302017-11-11T22:11:46+5:30
तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. नियोजन नसल्याने अधिकारी उडवाउडवीची उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे. यामुळे शेतकºयांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. शासनाकडे निधी नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याचे दिसते.
आष्टी, साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा या भागात रबीचे सिंचन क्षेत्र अधिक आहे. यावर्षी सोयाबीनने मोठा विश्वासघात केला. कपाशीवर रोग आणि किडीने आक्रमण केले. अशा स्थितीत हाती आलेले पीक आणि त्याला मिळालेला भाव अश्रू ढाळणारा आहे. याही विपरित परिस्थितीवर जीगरबाज बळीराजाने रबीसाठी परिपूर्ण तयारी केली आहे. शेताच्या बांधावरून पाटचºयापर्यंत सिंचनाची व्यवस्था केली. शासकीय सेवा मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांचा पुरता गोंधळ उडाला. अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने उर्ध्व वर्धा डावा कालवा, पाटचºया उपविभाग तळेगाव व मोर्शी येथील कार्यालयांनी दुरूस्ती व साफसफाई करण्याचे आश्वासन दिले होते; पण सर्व आशांवर पाणी फेरले गेले आहे.
कालवे, पाटचºयांना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. सिमेंट काँक्रीटची दुरूस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. दर्शनी भागावर थोड्याफार प्रमाणात दुरूस्ती केल्याचे दिसते; पण आतील भागात असणाºया कालवे व पाटचºया जैसे थे आहेत. या विभागाचे नियंत्रण अमरावती येथून आहे. तसेच उपविभागीय अभियंता कार्यालय, कार प्रकल्प कारंजा, यांच्या अधिनस्त असणाºया कालव्यांचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील सिंचनाचाची प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासनाने पाणी वाटप संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. यामुळे पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन संस्थांनीही करावे, असे अधिकारी सांगत असतात. पाटचºया बांधून दिल्यावर त्याची निगा राखण्याची जबाबदारी शेतकºयांचीच असल्याचे शासनाचे धोरण आहे; पण शेतकºयांना या दुरूस्तीसाठी आजपर्यंत काहीच मोबदला मिळालेला नाही. परिणामी, शेतकरी तथा अधिकारीही सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनानेच कालवे व पाटचºया दुरूस्त करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देत अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.
महिनाभरात जेसीबीने झुडपे काढणार
अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने मेकॅनिकल विभागाकडून एक जेसीबी स्वतंत्र घेण्याचे ठरविले आहे. त्या माध्यमातून महिनाभरात जेसीबीच्या साह्याने सर्व समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पूर्वी असलेले आर्वी आणि तळेगाव येथील उपविभाग बंद झाल्यामुळे एकाच उपविभागावर जबाबदारी आली आहे.
कर्मचाºयांचा तुटवडा कारणीभूत
कालवे साफ करण्याकरिता शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, मजूर सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे कर्मचारी कमी आणि काम अधिक, असे समीकरण झाले आहे. परिणामी, दुरूस्तीची कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. आता तक्रारीच्या तीव्रतेप्रमाणे आवश्यक ठिकाणी आधी दुरूस्ती करून देण्यात येईल, असे धोरण आखण्यात आल्याचे सांगितले जाते.
शेतकरी आंदोलनाच्या मानसिकतेत
खरीप हंगामातील कपाशी आणि तूर पिकाकरिता सध्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; पण कालवा तथा पाटचºया क्षतिग्रस्त असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी, शेतकºयांच्या शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. कालवे, पाटचºयांची दुरूस्ती केली जात नसल्याने शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.