गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:48 AM2017-09-23T00:48:01+5:302017-09-23T00:48:26+5:30

अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा ......

Bundle of goahda-salai (Peewalt) road | गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा

गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देअपघाताची भीती : संबंधीतांनी लक्ष द्यावे,नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. समोरून येणारे वाहन सहज दिसत नसल्याने अपघाताची भीती बळावत असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
रस्त्याच्या कडेला असलेले झुडपे तसेच खचलेला नाल्यावरील पुल अपघाताला आमंत्रण देत आहे. याकडे स्थानिक ग्रा.पं. प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. हिंगणी-माळेगाव(ठेका) या मुख्य मार्गाला गोहदा-सालई (पे.) मार्ग मिळतो. नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने सध्या स्थितीत रस्ता गुळगुळीत आहे. परंतु, रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे वळण मार्गावर इतर वाहनचालकांना सामोरुन येणाºया वाहनाचा अंदाज सहज येत नाही. रस्त्याच्या कडेला असलेली वाढलेली झुडूपे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने सदर प्रकरणी संबंधीतांनी तात्काळ योग्य पाऊल उचलून उपाययोजना कराव्या, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांची आहे.
तीन वर्षांपासून पुलाचे भगदाड बुजविले नाही
सालई(पेवठ) गावाला पाणी पुरवठा करणाºया विहीरी लगत असलेल्या नाल्यावरील पुलाला भगदाड पडले आहे. गत तीन वर्षापासून हा पुल नादुरुस्त आहे. वारंवार संबंधीतांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याची परिसरात ओरड आहे. पुलाचे भगदाड सहज दिसत नसल्याने अपघात बळावत आहे.
 

Web Title: Bundle of goahda-salai (Peewalt) road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.