चार वर्गांचा भार एकाच शिक्षिकेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:41 AM2017-07-19T00:41:31+5:302017-07-19T00:41:31+5:30

देवळी पं.स.च्या नागझरी केंद्रातंर्गत असलेल्या जामणी येथील जि.प. शाळेत चार वर्ग आहेत; पण शिक्षिका एकच आहे.

The burden of the four classes on one teacher | चार वर्गांचा भार एकाच शिक्षिकेवर

चार वर्गांचा भार एकाच शिक्षिकेवर

Next

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी पं.स.च्या नागझरी केंद्रातंर्गत असलेल्या जामणी येथील जि.प. शाळेत चार वर्ग आहेत; पण शिक्षिका एकच आहे. परिणामी, चार वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसून ज्ञानदान करावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जामणी जि.प. शाळेत चार वर्ग आहे. शाळा २८ जूनपासून सुरू झाली असून अद्याप एकच शिक्षिका कार्यरत आहे. चारही वर्गांना एकच शिक्षिका शिकवित असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. चार वर्गांना शिकविताना सदर शिक्षिकेला कसरत करावी लागत आहे. शाळेची पटसंख्या २७ असून सर्व वर्गातील विद्यार्थी एकत्र बसवित असल्याचे दिसून आले. एकाच वर्गात बसत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यात पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना काय कळेल, हा प्रश्नच आहे. शिक्षक वाढविण्याकरिता अनेकदा शिक्षण विभागाकडे मागणी करण्यात आली; पण शिक्षक देण्यात आले नाही. आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. येथे किमान दोन शिक्षक देण्याची मागणी आहे.

Web Title: The burden of the four classes on one teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.