बलात्कारातील आरोपींकडून घरफोडीची कबुली
By admin | Published: October 11, 2014 11:12 PM2014-10-11T23:12:24+5:302014-10-11T23:12:24+5:30
शहरातील गांधीनगर येथे एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्यांनी शहरात दोन
वर्धा : शहरातील गांधीनगर येथे एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्यांनी शहरात दोन ठिकाणी घरफोडी केल्याचेही यावेळी कबुली केले. त्यांच्याजवळून या दोन्ही गुन्ह्यातील एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांनी कलम ३७६ (२) (आय) भादंविच्या सहकलम ४, ६ अन्वये लहान मुलांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ मध्ये विनोद बाळू जाधव व सुनील राजू जाधव रा. वडर झोपडपट्टी, आर्वी नाका, या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघेही चोरी करण्याच्या उद्देशाने कुलूपबंद घराची पाहणी करीत होते. अशात त्यांना एक मुलगी फुले तोडत असताना दिसली. त्यांनी तिला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर बलात्कार केला. या गुन्ह्यात दोघांना अटक केली असता हे दोन्ही आरोपी सराईत चोरटे असल्याचे समोर आले. या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखविताच आरोपितांनी गोंडप्लॉट व स्वागत कॉलनी येथे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपितांकडून गोडप्लॉट येथील चोरीतील रोख पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजार २०० रुपयांचा माल तसेच स्वागत कॉलनी येथील चोरीस गेलेला सोन्याच्या ७ अंगठ्या २१ ग्रॅम, चांदीच्या चार वाट्या, चार मनगट्या, एक करदोडा असा एकूण ५४ हजार १५ रुपये एकूण किंंमत ९९ हजार २१५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे, जमादार शेख नबी, प्रमोद जांभुळकर, गजानन लामसे, गजानन कठाणे, मनोहर मुडे, संजय राठोड, सचिन वाटखेडे, सचिन खैरकार यांनी केली.(प्रतिनिधी)