वर्धा जिल्ह्यात धावत्या टँकरची केबिन जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:00 PM2021-02-12T12:00:37+5:302021-02-12T12:00:56+5:30
Wardha News पुलगावकडून देवळीकडे जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या एम एच ४८ ए वाय ४८७६ क्रमांकाच्या रिकाम्या टँकरच्या केबिनला अचानक आग लागली.
ठळक मुद्देजिवितहानी नाही, परिसरही वाचला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगावकडून देवळीकडे जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या एम एच ४८ ए वाय ४८७६ क्रमांकाच्या रिकाम्या टँकरच्या केबिनला अचानक आग लागली. चालकाने सतर्कता दाखवत टँकर रस्त्याच्या बाजूला उतरविला व स्वत:चा जीव वाचवला. ही घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास देवळी-पुलगाव रोडवर जामनी शिवारात घडली.
देवळी पोलिसांनी अग्निशमनाची गाडी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीची भीषणता इतकी होती की केबिन व दोन्ही टायर्स जळून खाक झाले. यात टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.