शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:20 AM2019-02-10T00:20:45+5:302019-02-10T00:21:16+5:30
विद्युत प्रवाहित तारांमध्ये घर्षन होऊन आगीची ठिणगी ऊसावर पडली. बघता-बघता आगीने ऊसाला आपल्या कवेत घेतले. ही घटना नजीकच्या सुकटी (बाई) येथे घडली असून शेतकरी प्रभाकर गौळकर यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : विद्युत प्रवाहित तारांमध्ये घर्षन होऊन आगीची ठिणगी ऊसावर पडली. बघता-बघता आगीने ऊसाला आपल्या कवेत घेतले. ही घटना नजीकच्या सुकटी (बाई) येथे घडली असून शेतकरी प्रभाकर गौळकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आहे.
शेतकरी प्रभाकर नाना गौळकर यांचे सदरची घटना सुकळी बाई शिवारात शेत असून त्यांनी दोन एकरात ऊसाची लागवड केली. योग्य निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सदर पीक कापणीला आले असताना ही घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणच्या आंजी (मो.)च्या कार्यालयासह महसूल विभागाला तक्रार करण्यात आली आहे.