बस व आॅटो चालकांत जुंपली
By admin | Published: April 12, 2015 01:49 AM2015-04-12T01:49:11+5:302015-04-12T01:49:11+5:30
बसस्थानकावर बस वळवित असताना शुक्रवारी एका बसची आॅटोला डॅश लागली. यात बस व आॅटो चालकात शाब्दिक वाद झाला. वादानंतर दोघेही शांत झाले.
वर्धा : बसस्थानकावर बस वळवित असताना शुक्रवारी एका बसची आॅटोला डॅश लागली. यात बस व आॅटो चालकात शाब्दिक वाद झाला. वादानंतर दोघेही शांत झाले. यामुळे वाद निवळला असे वाटले होते. पण शनिवारी सकाळी त्या बसचा चालक स्थानकावर आला असता आॅटोचालकांनी त्याला मारहाण केली. तसेच बस चालकांनी आॅटो पलटविल्याचा आरोपही आॅटोचालकांनी केला. यासंदर्भात बस व आॅटो चालकांनी पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रार केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बस चालक सुहास रघाटाटे हे बस घेवून स्थानकात येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आॅटोला त्यांची डॅश लागली. यात आॅटो चालकाने बस अडवून चालकाशी वाद घातला. दोघांत झालेला वाद शाब्दिक असल्याने तो थोडक्यात निवळला. दोघेही आपापल्या रस्त्याने निघून गेले. यामुळे हा वाद शांत झाला असे वाटत असताना हा वाद शनिवारी पुन्हा उफाळला. सकाळी धडक देणाऱ्या बसचा चालक सुहास रघाटाटे स्थानकात आला असता त्याला त्या आॅटो चालकाने मारहाण केली. यात तो जखमी झाला. त्यांनी घटनेची माहती बसस्थानकात दिली. काही बसचालक व वाहकांनी आॅटोस्टँडकडे येत दोन आॅटो पलटविल्याचा आरोप आॅटो चालकांनी केला. यामुळे बसस्थानक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होत. घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. आॅटोचालकांची नेहमीच अरेरावी होत असल्याचा आरोप चालकांनी केला. करण्यात या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अज्ञात आॅटो चालकावर कलम ३२४ अन्वये तर बसचालक व वाहकांवर ४२७ अन्वये कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)