बसची कारला धडक; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:26 PM2019-05-29T22:26:49+5:302019-05-29T22:28:08+5:30
वर्धा-नागपूर महामार्गावर वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिग्रस-नागपूर या एम. एच. १४ बी. टी. ४७६० क्रमांकाच्या बसने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. २८ आर. ३२२२ क्रमांकाच्या कारला जबर धडक दिली. यात कार मधील चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : वर्धा-नागपूर महामार्गावर वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिग्रस-नागपूर या एम. एच. १४ बी. टी. ४७६० क्रमांकाच्या बसने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. २८ आर. ३२२२ क्रमांकाच्या कारला जबर धडक दिली. यात कार मधील चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यावरच उभ्या राहिल्याने या परिसरातील वाहतूक खोळंबली होती.
वर्धा-नागपूर महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. अशातच हा झालेला आठवा अपघात आहे. मागील सात अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. अशातच भरधाव असलेल्या वाहनाच्या चालकाचे लक्ष थोडेजरी विचलीत झाल्यास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटतो. त्यामुळे कंत्राटदारानेही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सूचना फलक लवण्याची गरज आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर जखमींची नावे कळ शकली नाही.