वर्धा जिल्ह्यात ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले; बस कलंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:07 PM2019-07-31T13:07:13+5:302019-07-31T13:07:37+5:30
तळेगाव-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तळेगाव-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या बसमध्ये असलेले ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले आहेत.
सकाळी ११ वाजता वरूड डेपोची बस आर्वी येथून वरूडकडे जाण्यासाठी निघाली. तीत ४० शालेय विद्यार्थी होते. रस्त्याच्या बाजूला वळणमार्ग तयार केला होता. त्यावर मुरूमही टाकलेला होता. या मुरुमाची योग्य रितीने दबाई न केल्याने ही बस तेथून जाताच ती कलंडली व तेथील दलदलीत अडकून पडली.
बस कलंडल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरविले व मिळेल त्या वाहनाने वरुडकडे रवाना केले.