तितली भोवरा खेळातून होत होती पैशाची हार-जीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:30 AM2018-11-21T00:30:12+5:302018-11-21T00:30:31+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकासमोर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून तब्बल ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह ३.५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकासमोर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून तब्बल ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह ३.५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर ४३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जि.प. सदस्य उमेश जिंदे हा त्याचा भाऊ राजेंद्र जिंदे व इतर काही नोकरांच्या मदतीने वर्धा रेल्वे स्टेशन जवळील परिसरात मोकळ्या जागेवर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून जुगार भरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून जुगार खेळताना राजेंद्र जिंदे, राहुल सूर्यवंशी, गोपाल वानखेडे, ललीत पांडे, राजेश मुजबैले, गोपाल भंडारी, प्रकाश ताकसांडे, निलेश बोरसरे, अतुल राऊत, गणेश गेडाम, सुशील भडके, मनोज सिडाम, रवी करमरकर, किशोर लोंढेकर, संदीप भेंडारे, सुमीत सोनटक्के, निखील तुमडे, अमोल नेहारे, प्रकाश गायकवाड, ईस्माईल नझीर शेख, शंकर हजारे, गजानन बनकर, पवन उमरे, कृष्णा डोळ, प्रमोद नाडे, रविंद्र जगताप, जगत राकडे, दीपक बाकडे, शेख इस्राईल शेख अहमद, प्रणय देशभ्रतार, प्रदीप बुलकुंडे, शुभम खंडारे, ईश्वर जाधव, नितेश बादलमवार, पंजाब ठाकरे, यासिन ईस्राईल खान, भुषण वैद्य, कृष्णकुमार गुप्ता, पद्माकर डुकरे, पांडुरंग धोटे, अजय ठाकुर रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी रोख १ लाख ८ हजार ७६० रुपये व ३० मोबाईल तसेच डावावरील रोख ७०,२२० रुपयेव इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५४ हजार ९८० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गादर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढोले यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखेडे, अशोक साबळे, नामदेव किटे, सलाम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, दीपक जाधव, राजेंद्र ठाकुर, स्वप्नील भारद्वाज, हरीदास काकड, जगदीश डफ, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, मनीष श्रीवास, तुषार भुते, अमित शुक्ला, वैभव कट्टोजवार, हितेंद्र परतेकी, राकेश आष्टनकर, प्रदीप वाघ, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे, चंद्रकांत कोहचडे, विशाल शेंडे, उदय दाते, भुषण भोयर, बालाजी मस्के, चेतन पापडे, राठोड आदींनी केली.