सेलूत १ हजार पोते तूर खरेदी

By admin | Published: April 24, 2017 12:17 AM2017-04-24T00:17:55+5:302017-04-24T00:17:55+5:30

नाफेडच्या तूर खरेदीत असलेली संथगती व बारदाण्याच्या कमतरतेमुळे रखडलेल्या खरेदीतून काल टोकणप्राप्त शेतकरी व नाफेडचे अधिकारी यांच्यात वाद झाला.

Buy 1000 thousand grandson ture sell | सेलूत १ हजार पोते तूर खरेदी

सेलूत १ हजार पोते तूर खरेदी

Next

दीड हजार पोते शिल्लक असताना खरेदी बंद
सेलू : नाफेडच्या तूर खरेदीत असलेली संथगती व बारदाण्याच्या कमतरतेमुळे रखडलेल्या खरेदीतून काल टोकणप्राप्त शेतकरी व नाफेडचे अधिकारी यांच्यात वाद झाला. यात कृउबासचे सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, नायब तहसीलदार तीनघसे, ठाणेदार संजय बोढे यांनी मध्यस्थीने वाद निवळला होता. यानंतर रविवारी एक हजार पोते तूर खरेदी करण्यात आली. तर अजूनही टोकणप्राप्त २ हजार पोते तूर खरेदी अभावी पडून आहे. खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.
सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी सुरू करण्यात आली; परंतु तुरीची आवक असतानाही नाफेडच्या नियोजनशुन्य कारभारामुळे तूर खरेदीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. यातूनच काल टोकणप्राप्त अडीच हजार पोते तूर खरेदी अभावी तशीच पडून राहिली. आज १ हजार पोते खरेदी करीत दोन हजार पोते शिल्लक असताना खरेदी बंद केल्याने परत शेतकऱ्यात असंतोष पसरला. शेतकऱ्यांनी नाफोडच्यावतीने तूर खरेदी वाढवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवर शासन काय निर्णय घेणार हे सोमवारीच कळणार असून या निर्णयाकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहे.(तालुका प्रतिनिधी)

बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर पडूनच
नाफेडच्या तुर खरेदीत अनियमीतता व संथगती असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बारदाण्याची मागणी विहित मुदतीत केली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. शेतकऱ्याचा माल अजूनही कृउबास समितीच्या यादीत पडून असताना नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती विद्याधर वानखेडे व उपसभापती रामकृष्ण उमाटे यांनी सहा. निबंधक व जिल्हाधिकाऱ्याकडे नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.

समीर कुणावार यांनी केल्या तात्काळ तूर खरेदीच्या सूचना
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी बंद केली होती. याची दखल घेत रविवारी आ. समीर कुणावार यांनी थेट बाजार समिती गाठत नाफेडच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत ताबडतोब तूर खरेदी करण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष प्रेम बंसतानी, उपाध्यक्ष चंदू मावळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Buy 1000 thousand grandson ture sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.