बिबटने पाडला वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:11 AM2018-05-08T00:11:10+5:302018-05-08T00:11:28+5:30
झाडाला बांधून असलेल्या वासरावर बिबटाने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. ही घटना नारा येथे घडली असून या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून जंगल भागातून शेताकडे आणि गावांकडे येत असलेल्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : झाडाला बांधून असलेल्या वासरावर बिबटाने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. ही घटना नारा येथे घडली असून या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून जंगल भागातून शेताकडे आणि गावांकडे येत असलेल्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली आहे.
नारा येथील शेतकरी भगवान केशव बुवाडे यांच्या शेतात दीड झाडाला वासरू बांधून होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती वनविभाला देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हा हल्ला बिबटाचाच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पंचनामा केला असून पीडित शेतकºयाना आर्थिक मदत देण्याकरिता पुढची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागात पाणवठे आटल्याने जंगली जनावरांचा गावाकडे मोर्चा वठला असून जंगलव्याप्त भागात अशा घटना घडत आहेत. याचा वनविभागाच्या अधिकाºयांनी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.