‘समृद्धी’च्या कंत्राटदाराचा कॅम्प उडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:23 PM2019-06-06T22:23:54+5:302019-06-06T22:24:19+5:30
नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.
विरूळ (आकाजी)पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी शिवारात कॅम्प लावण्यात आला होता. येथे जवळपास २०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ८ ते १० एकर परिसरात विस्तार असलेल्या या कॅम्पला मंगळवारच्या वादळाच्या तडाखा बसला. अधिकाऱ्यांची घरे, कार्यालय व गेस्ट हाऊस पूर्णत: कोसळून जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेला पेट्रोलपंपही पूर्णत: कोसळला असून कामावर असलेली जड क्रेन मशीनही कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील संपूर्ण इमारतीवरील टिनपत्रे उडून गेले. यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या संपूर्ण वादळामुळे अॅपकॉन कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वादळामुळे कर्मचाºयांनी जीव मुठीत घेऊन शेडमध्ये आश्रय घेतला होता, त्यामुळे कुठलीही जीवहानी झाली नाही, अशी माहिती या कॅम्पचे प्रभारी अधिकारी वीरेंद्रकुमार झा यांनी लोकमतशी बोलताना दिली.