स्वतंत्र विदर्भासाठी रक्ताने स्वाक्षरी केलेल्या पत्रांचे अभियान

By admin | Published: May 2, 2017 12:19 AM2017-05-02T00:19:00+5:302017-05-02T00:19:00+5:30

विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाकरिता रक्ताने सह्या करून पत्र पाठविण्याचे अभियान सोमवारी वर्धेतून सुरू करण्यात आले.

Campaign for blood signature signed for independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भासाठी रक्ताने स्वाक्षरी केलेल्या पत्रांचे अभियान

स्वतंत्र विदर्भासाठी रक्ताने स्वाक्षरी केलेल्या पत्रांचे अभियान

Next

वर्धा : विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाकरिता रक्ताने सह्या करून पत्र पाठविण्याचे अभियान सोमवारी वर्धेतून सुरू करण्यात आले. तत्पूर्वी, अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचे ध्वजारोहण केले.
धुनीवाला मठ येथील विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यालयातून अभियानास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल कठाणे, युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे व कार्यकर्त्यांनी रक्ताने हस्ताक्षर अभियानात सहभाग घेतला. १०० कार्यकतर्यांनी बोटातून रक्त काढून विदर्भ राज्य आघाडीच्या पत्रावर सह्या केल्या. यात विदर्भातील ११ जिल्ह्यांतून १० हजार पत्र रक्ताने सह्या करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार असल्याचे अणे यांनी सांगितले. यावेळी आशीष इजनकर, वैभव लोनकर, अनिकेत डेंगेकर, स्वप्निल बुजबैले, प्रफूल्ल भोयर सह कार्यकर्ते उपस्थित होते.
काळा दिवस
वर्धा : विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे हा काळा दिवस पाळला. याप्रसंगी वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत विदर्भ राज्याचा झेंडा उंचावण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Campaign for blood signature signed for independent Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.