पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:52 PM2017-08-23T23:52:17+5:302017-08-23T23:52:40+5:30
बंदी असतानाही बाजारपेठेत पीओपींच्या मुर्तींची विक्री होत असल्याने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बंदी असतानाही बाजारपेठेत पीओपींच्या मुर्तींची विक्री होत असल्याने न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन बुधवारी वर्धा न.प. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहरात धडक मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत सुमारे २५ मूर्ती विक्रेत्यांना दंड ठोठावला आहे.
वर्धा न.प.च्या अधिकारी व कर्मचाºयांच्या चमुंनी स्थानिक शिवाजी चौक येथून सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू केलेल्या धडक मोहीम कारवाईत शिवाजी चौक भागातील काही मूर्ती विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले. आज दुपारी १ वाजेपर्यंत न.प.च्या या विशेष पथकाने मूर्ती विक्रेता विनोद कच्छवा, राहुल जाधव, अतुल चौधरी, स्वप्निल बिजवे यांना अनुक्रमे ५००, ७५०, १ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वसूली केली. सायंकाळी उशीरापर्यंत सुमारे २५ मूर्ती विक्रेत्यावर कारवाई करून न.प. कर्मचाºयांनी दंड वसूल केला. ही कारवाई प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, जगताप, पेटकर, निखिल लोहवे, निखिल कहाते, मानकर यांनी केली. पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.
कारवाईच्या भीतीपोटी बंद केले दुकान
पीओपीच्या मूर्ती विक्री करणाºयांवर न.प. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत असल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरल्याने अनेकांनी मूर्ती विक्रीचे दुकाने बंद केली. परंतु, यावेळी जे दुकान सूरू होते त्यांच्याकडून पीओपी मूर्तीची विक्री करणार नाही असे लेखी आश्वासन घेऊन नाममात्र दंडात्मक कारवाई केली.