कालव्याचे पाणी शेतात शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:27 AM2017-11-30T00:27:17+5:302017-11-30T00:28:55+5:30
बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचऱ्या व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकºयाच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
मदना येथील शेतकरी शंकर विठ्ठल तामखाने याच्या शेताजवळ जलाशयाचे गेट क्रमांक चार आहे. या गेटमधून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, पाटचऱ्यांची वेळीच दुरूस्ती न करण्यात आल्याने सोडण्यात आलेले पाणी थेट तामखाने यांच्या शेतात शिरले. यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतातील तीन एकरातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही झाडांना कापूस लागून असताना कापूस वेचताना चिखल तुडवावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी शंकर तामखाने यांच्या अडचणीत वाढ झाली असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
पाणी वापर संस्थेचेही दुर्लक्ष
पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांना वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी असे सांगितले. परंतु, संस्थेच्यावतीने मनात येईल तेव्हा पाणी सोडल्या जाते शिवाय त्यांच्या या मनमर्जी कामाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी साथ देत असल्याची परिसरात ओरड आहे. शेतकरी हितार्थ निर्णय घेत अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.
कालव्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण अध्यक्षांना माहिती दिली. परंतु, ते आमदार, खासदाराकडे जाण्याचा सल्ला देत आपली जबाबदारी झटकत आहेत. सदर प्रकारामुळे आल्यावर आत्महत्येचीच वेळ आली असून संबंधितांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी.
- शंकर तामखाने, शेतकरी, मदना.