आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 09:54 PM2017-08-30T21:54:36+5:302017-08-30T21:54:54+5:30
शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपये इतकी कर्ज माफी जाहीर केली आहे. या कर्ज माफीच्या योजनेला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपये इतकी कर्ज माफी जाहीर केली आहे. या कर्ज माफीच्या योजनेला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ घ्यावयाचा असल्यास आॅनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. प्रत्येक आॅन लाईन सेवा केंद्रात शेतकºयांची एकच गर्दी होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आॅन लाईन अर्जाची अट रद्द करावी, मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांच्या मार्फत सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल कडू यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविले आहे. निवेदनातून, सध्या प्रत्येक आॅन लाईन सेवा केंद्रात शेतकºयांंची प्रचंड गर्दी होत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणारा बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. आर्वी येथे कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छीनाºयांसाठी आॅन लाईन सेवा केंद्र देण्यात आले आहेत. परंतु, येथील लांबच लांब रांगा व वेळीच फेल होणारी लिंक यामुळे शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. आॅन लाईन सेवा केंद्रावर शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.
आॅन लाईन केंद्रावरील मोठी गर्दी पाहून अनेक शेतकरी आल्या पावली परत जात आहेत. जे थांबून अर्ज भरण्याची इच्छा ठेवतात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या सर्वाधिक त्रास वयोवृद्ध शेतकरी व महिला शेतकºयांना सहन करावा लागत आहे. ऐन कामांच्या दिवसांमध्ये शेतीच्या विविध कामांना फाटा देत दोन-दोन दिवस हेलपाटे मारूनही अर्ज भरल्या जात नाही. लहानसा अर्ज आॅन लाईन पद्धतीने भरण्यासाठी अनेकांना आठ-आठ दिवस हेलपाट्या मारव्या लागत आहेत. अर्ज भरून देणाºया केंद्रावर सध्या शेतकºयांची लूटच होत होत आहे. अव्वाच्या सव्वा मोबदला अर्ज भरून देणारे घेत आहेत. आॅन लाईन अर्ज भरणे ही अट शेतकºयांची अडचणी वाढविणारी असल्याने ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
उपविभागीय महसूल अधिकाºयांना निवेदन सादर करताना जि.प. माजी सभापती दादासाहेब गाडगे, सावकारी ग्रस्त समितीचे अध्यक्ष शेरसिंग जाधव, महादेव वानखेडे, गीता धोटे, युनुस पटेल, रमेश खैरवार, सुधाकर बायनोट, अरूण कुईटे, मधुकर दत्ययकार, अशोक कोल्हे, गंगाधर तायवाडे, प्रफुल्ल सोनवणे, कौसल्या दत्ययकार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.