संचमान्यतेचा काळा जीआर रद्द करा
By admin | Published: September 6, 2015 02:04 AM2015-09-06T02:04:20+5:302015-09-06T02:04:20+5:30
शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या संच मान्यतेबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे.
शिक्षण मंत्र्याचा काळा अध्यादेश रद्द करा : शिक्षक दिनी शिक्षकांचे साकडे
वर्धा : शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या संच मान्यतेबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार कारवाई केल्यास बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातीलन जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने शनिवारी या अध्यादेशाचा विरोध नोंदविला. यात महात्मा फुले समाला परिषेच्यावतीने काळ्या फिती लावून अप्पर जिलहाधिकारी संजय भागवत यांना निवदेन सादर केले. तर विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा कृति समितीच्यावतीने अुनदानाकरिता जिल्हा परिषदेच्या परिसरात काळे झेंडे दाखवित ठिय्या आंदोलन केले.
शिक्षणमंत्र्यांनी २८ आॅगस्टला महाराष्ट्रात शिक्षण संच मान्यतेचा नवा अध्यादेश जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे दोन कोटी विद्यार्थी शाळा बंद झाल्यामुळे शिक्षणापासून दूर फेकले जाणार आहेत. राजयातील सुमारे एक लाख शिक्षक हे अतिरिक्त ठरून, यापुढे त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. गत वर्षीच्या संचमान्यतेच्या गोंधळामुळे, मराठवाड्यात शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे उदाहरण ताजेच आहे. आता महाराष्ट्रातही शिक्षकांनी आत्महत्या कराव्या काय असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येचे कारण देवून शाळा बंद करून दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून बाहेर फेकणाऱ्या, आणि राज्यातील एक लाख शिक्षकांना अतिरिक्त ठरविणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढलेला नवीन संच मान्यता निकषाचा काळा अध्यादेश तत्काळ रद्द करावा, तसेच महाराष्ट्राच्या शिक्षणाचे वाटोळे करणाऱ्या शिक्षणमंत्री तावडे यांची शिक्षणमंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन वर्धा अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, विजय मुळे, निळकंठ राऊत, मुख्याध्यापक प्रदीप महल्ले, देविदास गावंडे, विनोद राऊत, धनराज कोल्हे, योगेश्वर कलोडे, अनिल खडतकर, राजेंद्र माकोदे, सुधीर साळवे, जयंत भालेराव, एकनाथ इंगोले, अनिल तडस, हरिष पुनसे, श्याम जगताप, बुचे, केशव तितरे, गजानन चौधरी, अजाब तिमांडे, उमेश नंदनवार यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)