ठिंबक तुषार वितरकांवर लादलेल्या अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:42 AM2018-08-01T00:42:10+5:302018-08-01T00:43:59+5:30

शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्याकडे करण्यात आलीे.

Cancel the terms imposed on the Positive Tushar Distributor | ठिंबक तुषार वितरकांवर लादलेल्या अटी रद्द करा

ठिंबक तुषार वितरकांवर लादलेल्या अटी रद्द करा

Next
ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन : नोंदणी बंद करण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्याकडे करण्यात आलीे.
कृषी विभागाने मूळ शासन निर्णयात नसलेल्या अटी लादल्या आहे.ठिंबक व तुषार सिंचन विक्रीचे २०१६- १७ पासूनचे लेखापरीक्षण करून घेण्याची सक्ती करण्यात येत आहे, विविध प्रपत्रात साठा मागवून वितरकांना कोंडीत पकडण्याचे शासनाचे धोरण अन्यायकारक आहे. शासनाने नव्याने लादलेली एक वितरक एक कंपनी ही अट रद्द करावी, ठिंबक व तुषार संच अनुदान प्रस्तावासाठी लागणारे बिल विक्री केलेल्या आर्थिक वर्षातील ग्राह्य धरण्यात यावे, दर महिन्याला जी एस टी भरावा लागत असल्याने पूर्व संमती मिळाल्यावर बिल देणे अडचणीचे ठरत आहे. वितरकांना वेठीस धरणाऱ्याअटी त्वरित मागे घ्यावा,अन्यथा राज्यातील ठिंबक व तुषार वितरक प्रमाणे वर्धा जिल्ह्यातील वितरकही नोंदणी करणार नाही,असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांना निवेदन सादर करताना ठिंबक वितरक संघाचे विदर्भ डिलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बायस्कर ,नितीन कडू, अजय वाघ, बोंबटकर,राजेश जोरे, अमोल ढोले, साहेबराव देशमुख, प्रमोद भांगे, प्रफुल बेलसरे, किशोर बारंगे, विकास खातदेव, महादेव पेंदे, संजय जायदे, अरुण पाटील, मनोहर मंगरुळकर, अमोल चोरे, सुरज गोहे, विद्या पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश विक्रेते उपस्थित होते.

Web Title: Cancel the terms imposed on the Positive Tushar Distributor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती