वर्धेत ‘कॅन्सर सर्च अॅण्ड ट्रीट’ उपक्रम
By admin | Published: October 1, 2014 11:26 PM2014-10-01T23:26:44+5:302014-10-01T23:26:44+5:30
दिवसंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर होणारा उपचार हा महागडा असल्याने तो ग्रामीण भागातील नागरिकांकरिता न परवडणारा आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती : राज्यातील पहिला प्रयोग
वर्धा : दिवसंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर होणारा उपचार हा महागडा असल्याने तो ग्रामीण भागातील नागरिकांकरिता न परवडणारा आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने ‘कॅन्सर अॅण्झ ट्रीट’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाकरिता राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून तो राज्यात एकमेव असल्याची माहिती जिल्हा शल्य शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनवने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांत सध्या वाढत असलेल्या या रोगाची माहिती होण्याकरिता जनजागृती व गावात जावून रुग्णांची तपासणी करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. एका महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने मिळालेल्या माहितीवरून एकूण २४ घरी भेटी दिल्या व विविध गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ८१ जणांची तपासणी करण्यात आली. या पैकी दोघांना कॅन्सरची लागण झाल्याचे सिद्ध झाले तर ५३ जण संशयीत असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते आॅगस्ट या काळात एकूण नऊ रुग्ण आढळले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. सी. राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हायपरटेंशनचे ४ हजार ६६८ रुग्ण
जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात हायपरटेंशनचे ४ हजार ६६८ रुग्ण आढळले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासण्यात आलेल्या १४ हजार ५७० रुग्णांपैकी १ हजार २२४ रुग्णांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याची टक्केवारी ८.४० टक्के असल्याचे समोर आले आहे. तर इतर रुग्णालयात तपासण्यात आलेल्या ५५ हजार ४२१ रुणांपैकी ३ हजार ४४४ नागरिकांना हा आजार असल्याचे समोर आले आहे. त्याची टक्केवारी ६.२१ एवढी असल्याचे समोर आले आहे.