वर्धा जिल्ह्यात भरधाव कार नाल्यात आदळली; कार चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:15 PM2020-10-09T14:15:07+5:302020-10-09T14:15:35+5:30
Wardha News अकोला येथून मोर्शीमार्गे वर्ध्याला जात असताना एक कार भरधाव वेगात आष्टी तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात आदळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: अकोला येथून मोर्शीमार्गे वर्ध्याला जात असताना एक कार भरधाव वेगात आष्टी तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात आदळली. कार चालकाचा स्पीड जास्त असल्यामुळे कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. कारचालक जखमी झाले. त्यांना तातडीने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून, पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. सदर घटना काल रात्री 11 वाजता घडली.
याबाबत सविस्तर असे की, अकोला येथील हर्षल देशमुख 30 वर्ष हे चार चाकी वाहन क्रमांक एम एच 27 अू.9099 या गाडीने निघाले असता मोर्शीवरून आष्टीला पोहोचले. परत येताना त्यांची कार अनियंत्रित झाल्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार खोल असलेल्या नाल्यांमध्ये आदळली. कारने पलटी खाल्ल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन यांनी तातडीने ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.
हर्षल देशमुख याला ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार केले. मात्र पायाला जास्त प्रमाणात मार असल्यामुळे तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. सध्या आष्टी तळेगाव या राष्ट्रीय महामागार्चे काम सुरू आहे. अनेक पुलाच्या ठिकाणी काँक्रिटीकरण अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.