नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 05:51 PM2017-09-17T17:51:46+5:302017-09-17T17:51:57+5:30

साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.  दीपक विठ्ठल गाढे (४०) व अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत.

Car driving on Nagpur-Amravati road collapses; Two killed, two serious | नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर 

नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर 

Next

वर्धा, दि. 17 -  साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. 
दीपक विठ्ठल गाढे (४०) व अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत. तर नितीन आनंद माने (४३) व मिलिंद शिंदे दोन्ही रा. सातारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील अथर्व शिंदे हा सातारा येथील आमदारांचा पुतण्या असल्याची माहिती आहे. 
पोलीा सुत्रानुसार, सातारा जिल्ह्यातील नितीन माने, दीपक गाढे, मिलिंद शिंदे आणि त्यांचा मुलगा अथर्व हे एम.एच. ११/ बी.एच. ४३८३ क्रमांकांच्या कारने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित जलतरण स्पर्धेकरिताजात होते. भरधाव कार नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात आली असता ती ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यांवर आदळली. यात दीपक व अथर्वचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारचालक नितीन माने व मिलिंद शिंदे गंभीर जखमी झाले. 
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे निरज लोही व रंजन पाटील यांनी आपला चमुसह घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला. या घटनेची कारंजा (घा.) पोलिसांनी नोंद घेतली आहे.

Web Title: Car driving on Nagpur-Amravati road collapses; Two killed, two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात