विम्याकरिता मालकानेच रचला कार चोरीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:07+5:30

पॅट्रिक आणि मॅथ्यूज हे दोघेही काही दिवसांपूर्वी रात्रीला कारमधून पुलगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. वर्गिस हा पुलगावच्या फर्टीलायझर कंपनीत व्यवस्थापक असल्याने कार तिथे लपवून ठेवली जाऊ शकते, म्हणून पोलिसांनी वर्गीसला सोबत घेऊन फर्टीलायझर कंपनी गाठली. सर्व परिसराचा शोध घेतल्यानंतर जवळपास खतांच्या १ हजार पोत्यांखाली कार ताडपत्रीने झाकून दिसली. विचारपूस केली असता विम्याकरिता हा बनाव केल्याची त्याने व पॅट्रिकने कबुली दिली.

Car theft plot hatched by the owner for insurance | विम्याकरिता मालकानेच रचला कार चोरीचा डाव

विम्याकरिता मालकानेच रचला कार चोरीचा डाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महागड्या कार चोरीचा विमा मिळविण्याकरिता कार चोरीला गेल्याची तक्रार सावंगी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता कार मालकानेच चोरीचा डाव रचल्याने उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी कारमालकासह त्याच्या सहकाऱ्याला अटक केली.
पॅट्रिक अखिलेश सिंग (२३) व वर्गिस म्यॅथुज (५५) दोघेही राहणार सावंगी, असे आरोपींचे नाव आहे. घरालगतच्या मोकळ्या जागेत उभी केलेली १४ लाख रुपये किमतीची कार चोरीला गेल्याची तक्रार पॅट्रिक याने १८ नोव्हेंबरला सावंगी पोलिसांत दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी उपनिरीक्षक सौरभ घारडे व त्यांच्या सहकाऱ्यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी फिर्यादी पॅट्रिक यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला असता पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला.  पॅट्रिक आणि मॅथ्यूज हे दोघेही काही दिवसांपूर्वी रात्रीला कारमधून पुलगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. वर्गिस हा पुलगावच्या फर्टीलायझर कंपनीत व्यवस्थापक असल्याने कार तिथे लपवून ठेवली जाऊ शकते, म्हणून पोलिसांनी वर्गीसला सोबत घेऊन फर्टीलायझर कंपनी गाठली. सर्व परिसराचा शोध घेतल्यानंतर जवळपास खतांच्या १ हजार पोत्यांखाली कार ताडपत्रीने झाकून दिसली. विचारपूस केली असता विम्याकरिता हा बनाव केल्याची त्याने व पॅट्रिकने कबुली दिली. दोघांनाही अटक करुन कार जप्त केली. दोघांनाही सावंगी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पाेलीस निरीक्षक संजय गायकवाड व बाबासाहेब थाेरात यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, महेश इटकल, स्वप्नाली भारव्दाज, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे, अभिजित वाघमारे, राकेश आष्टनकर, अंकित जिभे, विजय पंचटिके, दीपक गेडे व विष्णू काळुसे यांनी केली.

Web Title: Car theft plot hatched by the owner for insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर