उभ्या बसवर कार आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:15 PM2019-06-06T22:15:44+5:302019-06-06T22:16:18+5:30

टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महामंडळाच्या बसला दारूची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डोंगरगावलगतच्या नारायणपूर शिवारात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुखरूप बचावले.

A car on the vertical bus hit the car | उभ्या बसवर कार आदळली

उभ्या बसवर कार आदळली

Next
ठळक मुद्देदारूची अवैध वाहतूक : अपघातानंतर दारूची पळवापळवी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महामंडळाच्या बसला दारूची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डोंगरगावलगतच्या नारायणपूर शिवारात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना वाचविण्यापेक्षा कारमधील दारु लांबविण्यासाठी नागरिकांची झुंबड होती.
शेख इब्राहिम, असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे. हा एमएच ३१, ईयू-४६७२ क्रमांकाच्या कारमध्ये नागपुरातून दारूसाठा घेऊन चंद्रपूरकडे जात होता. नारायणपूर शिवारात एमएच ४०, एक्यू ६३९४ क्रमांकाच्या बसचा टायर पंक्चर झाल्याने चालक व वाहक टायर बदलवित होते.
यादरम्यान भरधाव येणाºया कारने बसला मागाहून जबर धडक दिली. यात कारचालक शेख इब्राहिम गंभीर जखमी झाल्याने तीन ते चार नागरिंकांनी लागलीच धाव घेत चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शंभरावर अधिक लोकांनी चालकाचा जीव वाचविण्यापेक्षा कारमधील दारू लांबविण्यासाठी धडपड चालविली होती. या वाहनाजवळ नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याने जखमीला बाहेर काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अरविंद येनुरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित, आशीष गेडाम यांनी पथकासह घटनास्थळ गाठून नागरिकांना बाजुला करीत जखमी चालकाला बाहेर काढून उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

दारूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची गरज
वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी असताना या दोन्ही जिल्ह्यात नागपुरातून दारूपुरवठा केला जातो. नागपुरातून भरलेल्या दारुची वाहतूक नागपूर ते चंद्रपूर या महामार्गाने होतात.
रात्र-दिवस या महामार्गाने दारूची वाहतूक करणारे वाहने सुसाट धावत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्याची गरज आहे.

Web Title: A car on the vertical bus hit the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात