एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:16+5:30

यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीनच उचलून पोबारा केला.घटनेच्यावेळी त्या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले.

Carry out an ATM machine and spread it around | एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार

एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार

Next
ठळक मुद्देसेलू येथील घटना : ६ लाख ९४ लाखांची रोख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : स्थानिक यशवंत चौकातील महाराष्ट्र बँकची एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार झाले. या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपयाची रोख असल्याचे सांगण्यात आले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजतादरम्यान घडली.
यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीनच उचलून पोबारा केला.घटनेच्यावेळी त्या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅण्ड सर्व्हीस सिस्टिम या कंपनीचे कर्मचारी अमोल हनुमंतराव तिघरे रा. बोरगाव (मेघे) यांनी सेलू पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मशीनसह ७ लाख ४४ हजार २०० रुपयाच्या चोरीची नोंद केली असून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार सुनिल गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सौरभ घरडे व कर्मचारी करीत आहे.

Web Title: Carry out an ATM machine and spread it around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.