आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कास्ट्राईब महासंघ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:59 PM2018-09-09T23:59:03+5:302018-09-09T23:59:45+5:30
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले.
या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालयात मागासवर्गीय कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्यात यावी. तसेच पदोन्नती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वर्ग ४ ची १५१ पदे मंजूर आहे. त्यातील ११७ भरलेली असून ३४ पदे रिक्त आहे, अशी माहिती शल्यचिकित्सकांनी बैठकीत दिली. रिक्त पदे तात्काळ भरण्यात येईल, तसेच अधिपरिचारीका यांच्या ड्युटीबाबत जे फेरबदल होतात त्या विषयीचा प्रश्न निकाली काढल्या जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीला राज्य सरचिटणीस गजानन थुल, धर्मपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय तायडे, दिनेश हिवराळे, विवेक वनकर, रेखा मानकर, अक्षय राठोड, विजय निंबाळकर, मनोज मून, अशोक वासनीक, कौशल्या येले, डॉ. प्रियंका राऊत, रामभाऊ हिंगवे, राजेंद्र पाटील, प्रदीप लोखंडे, मीरा मेश्रामकर, बारापात्रे, लेकरवाडे उपस्थित होते.