आकस्मिक भारनियमनाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:44 PM2017-09-14T23:44:02+5:302017-09-14T23:44:22+5:30
सध्या आकस्मित विद्युत भारनियम करण्यात येत आहे. वाढीव भारनियमनामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाटे : सध्या आकस्मित विद्युत भारनियम करण्यात येत आहे. वाढीव भारनियमनामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. महावितरणने भारनियमन कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत उपविभागाला निवेदन देण्यात आले आहे.
महावितरण सध्या सहा तास भारनियमन करीत आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक आजार डोके वर काढत आहे. वीज नसल्याने डासांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. यामुळे पद्मावती नगर व सयाजी नगर येथील नागरिकांनी विद्युतच्या उपविभागातील अभियंत्यांना निवेदन सादर केले. यात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, राजू शेवाळकर, दर्शन बाळापुरे, उमेश मंगरुळकर, गिरीश नागुलवार, चरडे शास्त्री, मुन्ना छत्रिय, आशीष घवघवे, वसंतराव लाजुरकर, प्रकाश जांगिड, गोपाल यादव, देवानंद फाटे, निशांत पराते, मिलिंद भगत, प्रफूल्ल घुंगरूड, संजय, साहेबराव सरकाटे आदी उपस्थित होते.