शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गोठा जळाला
By admin | Published: April 22, 2017 02:14 AM2017-04-22T02:14:33+5:302017-04-22T02:14:33+5:30
नजीकच्या सेलू (मुरपाड) येथील मणिक देवाजी खडसे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्क्रिटमुळे आग लागली.
एक लाखाचे नुकसान : सेलू (मुरपाड) येथील घटना
हिंगणघाट : नजीकच्या सेलू (मुरपाड) येथील मणिक देवाजी खडसे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्क्रिटमुळे आग लागली. यात गोठ्यातील साहित्य जळून कोळसा झाल्याने शेतकरी खडसे यांचे जवळपास १ लाखाचे नुकसान झाले असून शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
गोठ्याला लागलेल्या आगीत ओलितासाठी वापरण्यात येणारे १५ नग पाईप, ड्रीपच्या नळ्या अंदाजे १० हजार मीटर, ताडपत्री ३ नग, जनावरांचे वैरण, दोन मोटार पंपाचे पॅनल बोर्ड व इतर शेती उपयोगी जळून राख झाले. यात १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांना आगेवर नियंत्रण मिळविण्यात वेळीच यश आल्याने पुढील अनर्थ टळला.(तालुका प्रतिनिधी)