मोरांगणा येथे गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन, स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:08+5:30
प्रदर्शनीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे राहतील. कार्यक्रमाला पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पशुसंवर्धन विभाग आर्वीतर्फे १६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता गवळाऊ जनावरांची दुग्ध स्पर्धा आणि १७ ला सकाळी ८ वाजता जातिवंत गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन हुतात्मा स्मारक प्रांगण, मोरांगणा (खरांगणा) येथे करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे राहतील. कार्यक्रमाला पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री नागो गाणार, रामदास आंबटकर, अनिल सोले, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर तसेच जि.प.उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती
नीता गजाम आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, जि.प.च्या माजी उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, पंचायत समिती आर्वीचे सभापती हनुमंत चरडे आणि उपसभापती शोभा मनवर उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राजश्री राठी, विभा ढग, सुनीता चांदूरकर, किशोर शेंडे, जयश्री चौखे, सौरभ शेळके आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.