संतापजनक! कंटेनरमध्ये सापडले तब्बल २२ जनावरांचे मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 06:13 PM2022-06-10T18:13:30+5:302022-06-10T18:17:44+5:30

एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये २२ जनावरो मृतावस्थेत सापडली. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

cattle smuggling in wardha : 22 cattles found dead in a container | संतापजनक! कंटेनरमध्ये सापडले तब्बल २२ जनावरांचे मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस

संतापजनक! कंटेनरमध्ये सापडले तब्बल २२ जनावरांचे मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस

googlenewsNext

देवळी (वर्धा) : नजीकच्या एकपाळा शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये तब्बल २२ जनावरे मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अन्न-पाण्याअभावी या जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात असून, या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे. गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

एकपाळा शिवारात उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून कुजल्यागत दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ही माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता कंटेनरमध्ये जनावरांचे मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर देवळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रणाली जोशी यांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता अन्न-पाण्याअभावी या जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला. यवतमाळकडे जाणाऱ्या या कंटेनेरचा देवळी नजीकच्या यशोदा नदीजवळ टायर फुटल्याने हा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला. हा प्रकार नेमका काय, याबाबतची माहिती देवळीच्या ठाणेदार शफकत आमना यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस घेत आहेत.

जनावरांचा मृत्यू चार दिवसांपूर्वीच

एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये (आर. जे. १४ - जी. के. ९६९६) २२ जनावरांचे मृतदेह सापडले. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

जनावरांची अवैध तस्करी?

या कंटेनरमधून चार गंभीर दुखापत झालेली जनावरे पोलिसांना मिळून आली. कंटेनरमध्ये मृतावस्थेत सापडलेली जास्तीतजास्त जनावरे वळू असल्याने हा संपूर्ण प्रकार चोरीच्या जनावरांची कत्तलीसाठी अवैध तस्करी तर नाही ना, याचा शोधही सध्या देवळी पोलीस घेत आहेत.

चालकाचा वाहन सोडून पोबारा

भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने आणि कंटेनरमध्ये मृत जनावरे असल्याने कंटेनरच्या चालकानेही वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून घटनास्थळावरून पोबारा केला. पण, दुर्गंधी पसरल्याने पितळच उडले पडले. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मृत जनावरांना पुरविण्यात आले जमिनीत

कंटेनरमध्ये सापडलेल्या मृत जनावरांच्या मृतदेहांची दुर्गंधी परिसरात सुटल्याने आणि त्यांचे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर या सर्व जनावरांचे मृतदेह आबादी जागेत खोल खड्डा करून पुरण्यात आले. यावेळी पोलीस जमादार मेघरे, कुणाल हिवसे, गजानन युवनाथे, दयाल धवणे, आकाश कसर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Web Title: cattle smuggling in wardha : 22 cattles found dead in a container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.