बालकांवर कॉक्झॅकीचा हल्ला
By admin | Published: September 8, 2015 04:08 AM2015-09-08T04:08:09+5:302015-09-08T04:08:09+5:30
पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक
वर्धा : पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचा प्रकोप जाणवत आहे. सध्यास कॉक्झॅकी या विषाणूचा बालकांना विळखा पडला आहे. हात, पाय आणि तोंडावर लालसर अथवा पांढऱ्या रंगाचे पुरळ उठतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा प्रसार झपाट्याने होत असल्याचा बाब शहरातील बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराची लक्षणे असलेली रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.
कॉक्झॅकी हा विषाणू शरीराच्या हात, पाय, तोंड या अवयवांवर प्रभाव दाखवितो. यातही बालकांना याची लागण अधिक होते. आजाराची लागण होण्यापूर्वी ताप येतो. यानंतर अंगावर पुरळ येतात. पुरळ फुटल्यास त्यातून पाणी बाहेर पडते. कधीकधी यात पस होण्याचा धोका असतो. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
शहरातील विविध खासगी रुग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात या आजाराची लागण झालेली अनेक रुग्ण आढळले आहे. शिवाय गत आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आजारामुळे गंभीर परिणाम होत नसले तरी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरते.(स्थानिक प्रतिनिधी)
सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे
४संसर्ग झालेल व्यक्तीने सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.
४या विषाणूचा प्रभाव शाळकरी गटातील मुलांवर अधिक जाणवतो. याच वयोगटातील रुग्णसंख्या अधिक आहे. अंगावर पुुरळ अथवा लालसर चट्टे आढळल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.
४हा आजार संसर्गजन्य असल्याने आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येवून इतरांनाही त्या झपाट्याने लागत होते. त्यामुळे अशा व्यक्तीने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
वातावरणात दमटपणा आणि काही प्रमाणात तापमान हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असते. त्यामुळे विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. या काळात लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. कारण डेंग्यू, मलेरिया, हिवताप याचाही प्रकोप याकाळात जाणवतो. यापासून बचाव करणे हितावह ठरते.
- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धा
आजाराची लक्षणे
४मुलांच्या अंगावर पांढरे अथवा लालसर पुरळ आढळल्यास त्वरित रुग्णालयातून उपचार करून घ्यावे.
४या विषाणूची लागण होण्यापूर्वी मुलांना ताप येतो. तोंडाला व जीभेला फोड आल्याने जेवण करण्यास त्रास होतो. त्यामुळे मुलांचे जेवण कमी होते. चिडचिडपणा वाढतो. या आजाराचा प्रभाव पाच ते सहा दिवसांपर्यंत असतो. आजाराचे स्वरूप तितकेसे गंभीर नाही. तज्ज्ञांकडून उपचार करून घेतल्यास पुरळ कमी होतात. ताप चार ते पाच दिवसांपर्यंत राहू शकतो.