कपाशीवर लाल्या व बोंडअळीचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:59 PM2018-11-22T21:59:01+5:302018-11-22T22:01:18+5:30

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप याबाबतची बातमी लोकमतने सोमवारी प्रकाशित करताच सेलू तालुका कृषी विभागाच्या चमूने मंगळवारी शेतकऱ्यांच्या शेताला भेट देवून कपाशीची पाहणी केली.

Cauliflower and bollworm outbreak | कपाशीवर लाल्या व बोंडअळीचा प्रकोप

कपाशीवर लाल्या व बोंडअळीचा प्रकोप

Next
ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम: कृषी विभागाने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप याबाबतची बातमी लोकमतने सोमवारी प्रकाशित करताच सेलू तालुका कृषी विभागाच्या चमूने मंगळवारी शेतकऱ्यांच्या शेताला भेट देवून कपाशीची पाहणी केली.
डोरली शिवारात सुरेश केशवराव तेलरांधे व भाष्कर पांडुरंग गोमासे यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने तालुका तांत्रिक कृषी अधिकारी प्रियंका ढेरेंगे, कृषी पर्यवेक्षक किशोर वऱ्हाडे, कृषी सहाय्यक मंगेश ठाकरे यांनी कपाशीची पाहणी केली. तेलरांधे यांचे शेतात कपाशीवर मोठया प्रमाणात बोंडअळीने शिरकाव केल्याचे निष्पन्न झाले.
तर गोमासे यांचे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. बागायती शेती करणारा तालुका म्हणून ओळख असलेल्या भागात शेतकरी केळी पिकापासून फारकत घेत महागडा खर्च करुन कपाशीचे भरघोस उत्पन्न घेत असून आपली आर्थिक घडी सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करीत असताना यावर्षी पुन्हा गुलाबी बोंड अळी आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.
कृषी विभागाने शेतकºयांना कपाशीच्या लागवडी पासुनच बोंडअळी निर्मूलनासाठी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून सर्तकता बाळगण्यासाठी उपाय योजना सुचविल्या त्याचा शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन त्या उपायावर अंमल केला पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी असेच संकट कपाशीवर आल्यास कोणते पिक घेवून वर्षभºयाची आर्थिक घडी सुरळीत करता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषी विभागाने घोराड, झडशी आदी भागात दौरा केला आहे.

शेतकऱ्यांनी पिकाला पाणी दिल्यामुळे नवीन फुल व बोंडधारणा झाली आहे. त्यामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. तर काहीच्या शेतात पाण्याच्या ताणामुळे लाल्याचा प्रादुर्भाव झाला. कपाशीला आता पाणी देवू नये, तसेच जानेवारी महिन्यातच कपाशी उलंगवाडी करावी. बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसानग्रस्त पातळीच्या आत आहे.
- बाबुराव वाघमारे, तांत्रिक कृषी अधिकारी सेलू

Web Title: Cauliflower and bollworm outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस