केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:56 PM2018-01-06T23:56:24+5:302018-01-06T23:56:36+5:30

शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 Causes of cables hurt people | केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

Next
ठळक मुद्देरस्त्यावर सर्वत्र माती : पाईपलाईन फुटल्याने तयार होतोय चिखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाईप फुटून पाणी पुरवठा प्रभावित होणे तथा रस्त्यावर पाणी साचून चिखल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असून त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार सध्या शहरात सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
शहरातील मुख्य मार्ग ते बॅचलर रोडकडे जाणाºया रस्त्यांवर केबल टाकण्याचे काम केले जात आहे. यातील बडे चौक ते अष्टभूजा चौक मार्गावर केबल टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले. यात केबल टाकून नाली बुजविण्यात आली; पण ती व्यवस्थित बुजविलेली नाही. परिणामी, या मार्गावर सर्वत्र माती विखूरलेली आहे. केबल टाकण्यासाठी नाली खोदत असताना पाईपलाईनही फुटली. यामुळे सदर रस्त्यावर पाणी वाहताना दिसून येते. सकाळ-सायंकाळ रस्त्यावर पाणी राहत असल्याने ये-जा करणाºया वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय तेथील रहिवाश्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील एक आठवड्यापासून सदर मार्गावर हे काम सुरू आहे. शिवाय पूढे पाषाण चौकापर्यंत मागील एक आठवड्यापासून केवळ खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. पाषाण चौकातील सिमेंट रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. यामुळे बडे चौक ते पाषाण चौकापर्यंतच्या रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता मुख्य मार्गाला जोडणारा असल्याने तथा रामनगर, प्रतापनगर व त्यापूढील नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रहदारीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने वाहतुकीचाही खोळंबा होत आहे. परिणामी, मुली, महिला व वृद्धांना अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. दररोज घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला समज देत कामे लवकर आटोपावीत, नाली व्यवस्थित बुजवून माती काढून टाकावी आणि फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरूस्त करावी, अशी मागणी हवालदारपूरा व मालगुजारीपूरा येथील नागरिकांनी केली आहे.
याबाबत शनिवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना देण्यात आल्या आहे. शिवाय महावितरणच्या व्यवस्थापकांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
रस्त्यावर पाणी साचत असल्याने अडचण
बडे चौक ते अष्टभूजा चौक हा मार्ग रहदारीचा आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गाने वर्दळ असते. यातच सकाळी व सायंकाळी नळ सोडल्यानंतर फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. काही ठिकाणी हे पाणी साचून डबके तयार होत आहे. यामुळे नागरिकांची गोची झाली असून पाणीही व्यर्थ वाहून जात आहे. याकडे लक्ष देत ही पाईपलाईन त्वरित दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होत असल्याने छोटे-छोटे अपघात दररोज होत आहेत. परंतु, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.

Web Title:  Causes of cables hurt people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.