जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अधिक हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:09+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा समावेश करण्याबाबत पत्र पाठविले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील महिण्यात सी. सी. आय. अकोलामार्फत कापूस खरेदी केंद्राकरिता निविदा काढण्यात आली. त्यामध्ये आर्वी, देवळी, हिंगणघाट, कांढळी व सेलू या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र देण्यात आले परंतु वर्धा तालुक्यात एकही खरेदी केंद्र देण्यात आलेले नसल्यामुळे वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावात कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण होणार आहे. खासदार रामदास तडस यांच्याकडे सीसीआय व्दारा वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत कापूस खरेदीसाठी केंद्र्र मिळण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शाम कार्लेकर, प्रशांत इंगळे तिगांवकर, दत्ता महाजन, गंगाधर डाखोळे यांनी मागणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा समावेश करण्याबाबत पत्र पाठविले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केंद्र देण्याबाबतची मागणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार रामदास तडस यांनी बाजार समिती संचालकांना दिले.