शहर सुरक्षेकरिता ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:33 PM2018-08-02T22:33:47+5:302018-08-02T22:34:08+5:30

नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते.

CCTV cameras in 54 locations for city safety | शहर सुरक्षेकरिता ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

शहर सुरक्षेकरिता ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

Next
ठळक मुद्देसमीर कुणावार उपस्थित : ८३ कोटी रूपयांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक एस. निर्मलादेवी, उपविभागी अधिकारी समाधान शेंडगे, पोलिस अधिकारी भीमराव टेले, पोलिस निरीक्षक गावंडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार समीर कुणावार यांनी शहराची वाढती लोकसंख्या व वाढती गुंडागिरी पाहता अपुऱ्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी सदर कॅमेरे चांगले उपयोगी ठरू शकतात. यादृष्टिने पाठपुरावा करून ८३ लाख रूपये शासनाकडून मंजूर करून आणले. या कॅमेºयामुळे जनतेला वाहतुकीची शिस्त लागेल असा विश्वास आ. कुणावार यांनी व्यक्त केले. या सीसीटीवी कॅमेºयामुळे शहरात चांगली दहशत निर्माण होईल असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक एस. निर्मलादेवी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भीमराव खेडकर यांचा सपत्नीक सत्कार आ.कुणावार यांनी केला. संचालन ज्योत्सना गिरी यांनी केले.आभार डॉ अमोल कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रोग्रेसीव चे सचिव रमेश धारकर, माजी न प अध्यक्ष सुरेश मुंजेवार, मनोज रूपारेल , नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यात कॅमेरे लावण्याची योजना राबवा
आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नामुळे हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. जिल्ह्यातील इतर तालुका मुख्यालयातही अशा प्रकारे कॅमेरे लावून कायदा व सुव्यवस्था सांभाळावी अशी मागणी महिला संघटना व सामाजिक संस्थांकडून करण्यात आली आहे. सदर कॅमेरे पोलीस मुख्यालयातून कंट्रोल करण्यात येणार आहे.

Web Title: CCTV cameras in 54 locations for city safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.