वर्धेत तयार झाली सिमेंट पिच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:42 PM2018-07-03T23:42:21+5:302018-07-03T23:42:39+5:30
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सिमेंट पिचचे उदघाटन पालकवर्गांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक विनोद चौव्हाण, प्रविण लोहिया, अमृता घोडखांदे, सतिश हरदास, अविनाश ढगे, मोहन मते, अतुल केळकर, विनोद तडस प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सिमेंट पिचचे उदघाटन पालकवर्गांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक विनोद चौव्हाण, प्रविण लोहिया, अमृता घोडखांदे, सतिश हरदास, अविनाश ढगे, मोहन मते, अतुल केळकर, विनोद तडस प्रामुख्याने उपस्थित होते. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामाला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर पोफळी व उपाध्यक्ष जवाहर पटेल यांनी हिरवी झेंडी देऊन कामाची सुरूवात केली. खेळाडुंना टर्फ पिच प्रमाणे सिमेंट पिचवर सराव करणे अतिआवश्यक असते. सेंट अँथोनी शाळेतील शिक्षिका अमृता घोडखांदे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना घोडखांदे म्हणाल्या की, खेळाडुंना सेवा पुरविण्याचे काम फक्त संघटनेवर न लादता पालकांनीे सहभागी झाले पाहिजे जेणेकरून नविन खेळाडु तयार करतांना प्रशिक्षकाला मदत होईल. याप्रसंगी विनोद चव्हाण म्हणाले नागपूर येथे खेळायला गेल्यास त्यांना नेहमी सिमेंट पिचवर सराव करण्यासाठी सांगण्यात येत होते अशावेळी आपल्या येथे पिच नसल्याने खेळाडुंचा उत्साह कमी व्हायचा त्यांनी या कार्यासाठी प्रशिक्षक व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. सतिश हरदास,प्रविण लोहिया, अविनाश ढगे, मोहन मते यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व खेळाडुंना मिष्ठान वाटप करण्यात आले. संचालन किशोर मानकर तर आभार शशीकांत कांबळे यांनी केले. यावेळी हेमंत गहुकर, अश्विन सावल, नागोराव उराडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्वेश हरदास, रोमीत गलांडे, गौरांग ढगे, राज चौव्हाण, अनिरूध्द भांडवलकर, अनंत वगारहांडे, पियुष तडस, ओम पांडे, पियुष मते, ओम उगले, अजिंक्य केळकर, साहिल मुन, रूषिकेश विरखेडे, प्रथमेश शहारे आदींनी सहकार्य केले.