केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यायला हवे; बच्चू कडू यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:02 PM2021-02-06T16:02:16+5:302021-02-06T16:02:24+5:30
मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिच आहे.
वर्धा: आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वर्धा येथे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले की या आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातल सर्वात मोठं आणि सर्वात जास्त संख्येत असलेलं आंदोलन आहे.
मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिच आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे मोदींनी स्पष्ट करावं. कायदे मागे घेतल्यान शेतकऱ्यांच काहीच नुकसान होणार नाही तर होणार कोणाचं नुकसान हे स्पष्ट करावं. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला असं वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये , आपण त्या शेतकऱ्यांच्या मतदानावर भूलथापा देऊन दोन वेळा निवडून आले आहे, अस आता चालणार नाहीय. असच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित आहे अशी प्रतिक्रिया दिलीय.