केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:47 AM2021-02-08T05:47:10+5:302021-02-08T05:47:23+5:30

यवतमाळ, अमरावती, अकोल्यात कोरोना का वाढला?

Central Health Team inquires about three districts of Vidarbha | केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती

केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती

Next

अमरावती : देशात कोरोना संक्रमितांची संख्या घटत असताना अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आराेग्य विभागाच्या पथकाने रविवारी आरोग्य यंत्रणांची झाडाझडती घेतली. याच तीन जिल्ह्यांतच कोरोना का वाढला, असा सवाल चमूने उपस्थित केला. कोरोना उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका पथकाने ठेवल्याची माहिती आहे. 

दिल्ली येथील आरोग्य विभागाचे सुजित कुमार सिंग, संकेत कुलकर्णी व रणजित कौशिक या त्रिसदस्यीय चमूने अमरावती येथील सुपर स्पेशालिटी कोविड-१९ रुग्णालयात पाहणी करून आढावा घेतला. यावेळी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रमणले, अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, रेवती साबळे, रविभूषण आदी उपस्थित होते. चमूने जिल्हानिहाय कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. अमरावती जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांच्या मृत्युदराबाबत चिंतासुद्धा व्यक्त केली. कोराेना संसर्ग राेखण्यासाठी उपाययोजनांवर बोट ठेवले. आता कठोर उपाययोजना करा, चाचण्यांची संख्या वाढवा, आयसोलेटेड रुग्णांवर करडी नजर ठेवा, गृहविलगीकरणातील संक्रमित रुग्णांवर पाळत ठेवा, असा कानमंत्र स्थानिक आरोग्य यंत्रणांना दिल्याची माहिती आहे. 

कोरोनाच्या आनुषंगाने अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्हा आरोग्य यंत्रणांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. आतापर्यंत केलेल्या उपाययोजना आणि रुग्णसंख्येबाबतची माहिती चमूने घेतली. 
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Central Health Team inquires about three districts of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.