प्रसादासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:12 AM2019-09-03T00:12:45+5:302019-09-03T00:14:11+5:30

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

Certificate required for processing | प्रसादासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

प्रसादासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

Next
ठळक मुद्देविषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाप्रसाद वितरणातून विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. विना नोंदणी अन्न पदार्थांचे वितरण कायद्याने गुन्हा असल्याने गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्तींना अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या नियमान्वये नोंदणी करणे अन्न व औषध प्रशासन विभागाने आता अनिवार्य केले आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. यापूर्वी अन्य जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
याकरिता गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्ती यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता कोणत्याही आधार केंद्रातून किंवा सर्व सेवा केंद्रातून (सीएससी) किंवा ६६६.  www. foodlicensing. fassao.gov.in  या संकेतस्थळावर अन्नसुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये नोंदणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

गणेश मंडळांसाठी या आहेत सूचना
प्रसाद तयार करताना स्वयंपाक तयार करण्याची जागा स्वच्छ, नीटनेटकी व आरोग्यदायी असावी. प्रसाद तयार करताना कुठलेही कीटक त्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसादाकरिता लागणारा कच्चा माल , अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावे, त्याबाबतचे पक्के देयक घ्यावे. भांडी स्वच्छ, नीटनेटकी व झाकण असलेली असावी. शिल्लक राहिलेल्या प्रसादाचा पुनर्वापर दुसऱ्यादिवशी करू नये. कढी किंवा आमटीसारखे अन्नपदार्थ कल्हई न केलेल्या पितळी भांड्यात तयार करू नये, फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या परवाना, नोंदणीधारकाकडून करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी, प्रसाद तयार करणाºया स्वयंसेवकास अ‍ॅप्रॉन ग्लोव्हज, टोपी आदी पुरवावे, प्रसाद उत्पादन, वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठलाही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी, प्रसादाकरिता खोवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थांचा वापर होत असल्यास ताजा असल्याची खात्री करावी. जुना, शिळा अनेक दिवस शीतपेटीत ठेवलेला मावा प्रसादासाठी वापरू नये. प्रसाद तयार करणाºया मंडळांनी कच्च्या मालाचे देयक कॅटरर्स, स्वयंपाकी, स्वयंसेवक, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक माहिती लिहून ठेवावी. तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून सहकार्य करीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Web Title: Certificate required for processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.