अल्पवयीन मुलीशी चाळे; संगीत शिक्षकास पाच वर्ष कारावास

By चैतन्य जोशी | Published: March 23, 2023 06:58 PM2023-03-23T18:58:14+5:302023-03-23T18:58:23+5:30

आरोपी शेैलेंद्र थुल हा संगीत शिक्षक असून तो किरायाच्या खोलीत संगीताचे वर्ग घेण्याचे काम करीत होता.

Chale with a minor girl; Five years imprisonment for music teacher | अल्पवयीन मुलीशी चाळे; संगीत शिक्षकास पाच वर्ष कारावास

अल्पवयीन मुलीशी चाळे; संगीत शिक्षकास पाच वर्ष कारावास

googlenewsNext

वर्धा : अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करुन विनयभंग करणाऱ्या आरोपी संगीत शिक्षक शैलेंद्र खुशाल थुल रा. गोंडप्लॉट केजाजी चौक वर्धा याला कलम १० बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाच वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा तसेच सात हजार रुपये दंड ठोठावला. हा निवाडा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. आदोने यांनी २३ रोजी दिला.

आरोपी शेैलेंद्र थुल हा संगीत शिक्षक असून तो किरायाच्या खोलीत संगीताचे वर्ग घेण्याचे काम करीत होता. १३ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पीडिता ही डायपर आणण्यासाठी दुकानात गेली होती. काही वेळाने पीडिता ही रडत रडत घरी आली आणि तिने आरोपी शैलेंद्र थुल याने शिकवणी वर्गात बोलावून अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले. पीडितेने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिती आडे, यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ऍड. प्रसाद पी. सोईतकर यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी सुजीत पांडव, देवेंद्र कडू, यांनी यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर केले. शासनातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष व इतर सर्व साक्षीदारांसह जिल्हा सरकारी वकील ऍड. गिरीश व्ही. तकवाले यांनी केलेल्या यशस्वी युक्तीवाद ग्राह्य धरुन दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Chale with a minor girl; Five years imprisonment for music teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.