कारचालकाकडून कारचालकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:30 PM2019-02-11T22:30:50+5:302019-02-11T22:31:12+5:30

समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट-उमरेड मार्गावरील गिरडनजीक दारू घेऊन जाणाऱ्या एका कारने दुसºया कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने कारचालकाने दारूची वाहतूक करणाºया कारचालकाला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद करून त्यास चाकूने मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून विजय पुंडलिक हिवसे रा. हिंगणघाट, असे जखमीचे नाव आहे.

Chalkahala on the car driver | कारचालकाकडून कारचालकावर चाकूहल्ला

कारचालकाकडून कारचालकावर चाकूहल्ला

Next
ठळक मुद्देएक जखमी : दारूची वाहतूक करताना दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/गिरड : समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट-उमरेड मार्गावरील गिरडनजीक दारू घेऊन जाणाऱ्या एका कारने दुसºया कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने कारचालकाने दारूची वाहतूक करणाºया कारचालकाला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद करून त्यास चाकूने मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून विजय पुंडलिक हिवसे रा. हिंगणघाट, असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४९ ए.एस. ७७३० क्रमांकाचा कारचालक त्याच्या वाहनात सात बियर घेवून गिरडकडे जात होता. कार गिरड नजीक आली असता सदर कारचालकाने एम. एच. ३१ डी. व्ही. ७४०१ क्रमांकाच्या कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने एम.एच. ४९ ए.एस. ७७३० क्रमांकाचे कारचालक विजय हिवसे यांनी त्या कारचालकाला हटकले असता त्याने त्यांच्याशी वाद करून त्यांना चाकूने मारहाण करून जखमी केले. आरोपीने विजयला मारहाण करून घटनास्थळावरून कार सोडत पळ काढला. घटेनची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार महेंद्र ठाकुर यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठून जखमी विजयला सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे तातडीने रवाना केले. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही कारची बारकाईने पाहणी केली असता आरोपीच्या कारमध्ये १ हजार ४०० रुपये किंमतीच्या सात बियर आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर प्रकरणी गिरड पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chalkahala on the car driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.