चंद्रशेखरच्या उपोषणाने राजकीय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 02:11 AM2016-09-26T02:11:40+5:302016-09-26T02:11:40+5:30

नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत

Chandrasekhar's hunger strike | चंद्रशेखरच्या उपोषणाने राजकीय गर्दी

चंद्रशेखरच्या उपोषणाने राजकीय गर्दी

Next

चौथ्या दिवशीही पालिकेकडून दुर्लक्ष : आजी-माजी आमदारासह राजकीय नेते दाखल
सिंदी (रेल्वे) : नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत येथील चंद्रशेखर बेलखोडे याने आपल्या जनवारांसह उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला रविवारी चार दिवस झाले तरी पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. असे असले तरी शहरात राजकीय नेत्यांची गर्दी होत आहे.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी कुठलाही तोडगा निघाला नसल्याने कॉँग्रेसचे गटनेता तथा नगरसेवक आशिष देवतळे, नगरसेवक सुनील बोंबले, भाजपाचे गटनेता तथा नगरसेवक प्रविण सिर्सीकर, नगरसेविका पुष्पा सोनटक्के, जिजा तळवेकर यांनी उपोषणाच्या पेंडालमध्ये बसून एकदिवसीय लाक्षणीय उपोषण केले. त्याचप्रमाणे उपोषणाचा तोडगा काढण्यासाठी आठ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून नगर पालिकेची विशेष सभा तातडीने आयोजित करण्याबाबतचे लिखीत निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष यांनी सोमवारी दुपारी १ वाजता न.प. कार्यालय पालिकेची विशेष सभा बोलविली आहे. या सभेमध्ये काय निर्णय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान रविवारी आ. समीर कुणावार यांनी चंद्रशेखरच्या उपोषणाची माहिती घेण्याकरिता उपोषण मंडपात येत त्याच्याशी चर्चा केली. शिवाय त्याला ५० हजार रुपयांची मदतीही दिली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार अशोक शिंदे यांनी उपोषण मंडपात येत उपोषणकर्त्याची विचारणा केली. या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दुरध्वनीवर दिले. मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपोषणाला पाठिंबा देत सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास मनसेच्यावतीले आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.(प्रतिनिधी)

साऱ्यांचा
निवडणुकीवर डोळा
येत्या डिसेंबर महिन्यात येथील पालिकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय वातावरण उपोषणाच्या निमित्ताने चांगलेच तापले असल्याची चर्चा शहरात आहे. रविवारी तीनही पक्षाच्या नेत्यांच्या आगमनाने व त्यांच्या उपोषणकर्त्यांच्या विचारणेवरून याचा प्रत्यय शहरातील नागरिकांना आला.

Web Title: Chandrasekhar's hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.