कृषी चिकित्सालयाचा अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:07 AM2017-10-06T00:07:11+5:302017-10-06T00:07:17+5:30

आष्टी मार्गावर २ किमी अंतरावर कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची ५२ एकर जमीन आहे. पैकी १५ एकर जमीन वाहितीत असून उर्वरित जमीन पडिक आहे.

The chaos management of the Agricultural Department | कृषी चिकित्सालयाचा अनागोंदी कारभार

कृषी चिकित्सालयाचा अनागोंदी कारभार

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाºयांचे दुर्लक्ष : काटेरी तारांचे कुंपण तुटल्याने पिकांत चरतात गुरे

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत) : आष्टी मार्गावर २ किमी अंतरावर कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची ५२ एकर जमीन आहे. पैकी १५ एकर जमीन वाहितीत असून उर्वरित जमीन पडिक आहे. काही एकरात सोयाबीनचे पीक असून काही एकरात फळरोपवाटिका आहे; पण कृषी चिकित्सालयाचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे पीक तथा फळरोपवाटिकेची दुरवस्था असून लक्ष देत कार्यवाहीची मागणी होत आहे.
सोयाबीन पेरलेल्या जमिनीला एका भागाला रस्ता लागून असून एका भागाला पांदण रस्ता आहे; पण दोन्ही भागातील काटेरी ताराचे कुंपण तुटलेले आहे. यामुळे पिकात दिवसभर मोकाट गुरे चरून पिके उद्ध्वस्त करीत आहे. पडित जमिनीत गुराखी आपली गुरे चारतात; पण या सर्व बाबीकडे कार्यरत कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तेथे चरत असलेल्या गुरांचा त्रास शेजारील शेतकºयांना सोसावा लागत आहे. शासन दरवर्षी या जमिनीवर लाखो रुपयांचा खर्च करते; पण इतका खर्च करूनही सदर विभागाच्या जमिनीची दुरवस्था झाली आहे. अधिकारी कागदोपत्री खर्च दाखवित असून प्रत्यक्षात कामे होत नसल्याची स्थिती आहे. गुरांच्या त्रासाबाबत शेजारील शेतकºयांनी तेथील अधिकाºयांकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या; त्या तक्रारींकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याचे शेतकरी सांगतात. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत संबंधित कर्मचाºयांना उपाययोजना करण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: The chaos management of the Agricultural Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.